सुष्मिताने दिली गोड बातमी

सोमवार, 31 मे 2021 (11:36 IST)
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली. लवकरच तिच्या घरात एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सुष्मिता सेन लवकरच आत्या बनणार आहे. सुष्मिता भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी अभिनेत्री चारू असोपा हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. घरी येणार्या नव्या पाहुण्यासाठी उत्सुक असलेल्या सुष्मिता सेनने सोशल मीडियावर पोस्ट लिहून हा आनंद व्यकत केला. सुष्मिता सेनने नुकतेच इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून घरी येणार्या नव्या बाळाला कुशीत घेण्यासाठी ती किती उत्सुक आहे, हे सांगितले.
 
यात तिने तिच्या भावाची पत्नी अभिनेत्री चारू असोपाने शेअर केलेली पोस्ट जोडली आहे. चारूने बेबी बम्पसह हा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करत सुष्मिताने लिहिले, ही बातमी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी खूप आतुर होती. मी आत्या बनणार आहे. माझा भाऊ राजीव आणि चारू असोपा यांच्या पॅरेंटहूड जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. सुष्मिता सेनचा भाऊ राजीव आणि त्याची  पत्नी चारू आसोपा हे लग्राच्या दोन वर्षांनंतर आई-बाबा होणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती