Virat Kohli :कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत स्कूटरवर मुंबईत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल

Webdunia
रविवार, 21 ऑगस्ट 2022 (12:26 IST)
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सोमवारी (२२ ऑगस्ट) आशिया चषकासाठी रवाना होणार आहे. तो टीम इंडियासोबत झिम्बाब्वेला गेला नाहीये. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान त्याने लंडन आणि पॅरिसमध्ये सुट्टी घालवली. कोहली सध्या कुटुंबासह मुंबईत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्कूटर चालवताना दिसत आहे.
 
कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत स्कूटरवर मुंबईत फिरताना दिसला. चाहत्यांना टाळण्यासाठी दोघांनी काळ्या चष्मासह हेल्मेट घातले होते. असे असूनही, चाहत्यांनी त्याला ओळखले. त्यानंतर विराटचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले. फोटो पाहून असे दिसते की कोहली आणि अनुष्का शूटसाठी स्कूटरवर गेले होते.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

///
 
यापूर्वी अनुष्काने कोहलीसोबतचे फोटो शेअर केले होते. या फोटोत अनुष्का आणि विराट मस्तीच्या मूडमध्ये दिसत होते.
 

संबंधित माहिती

पुढील लेख