ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन

Webdunia
गुरूवार, 30 एप्रिल 2020 (09:56 IST)
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता षी कपूर यांचे गुरुवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.

ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन ऋषींच्या निधनाची दुखद बातमी दिली. ते म्हणाले की काही वेळा अगोदरच ऋषी यांचे निधन झाले आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख