Bollywood News: प्रसिद्ध गायक शानच्या निवासी इमारतीला आग लागली. प्रसिद्ध बॉलिवूड गायक शानच्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत अजून कोणीही जखमी झाल्याची बातमी समोर आली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील फॉर्च्युन एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली. प्रसिद्ध पार्श्वगायक शान या इमारतीच्या 11व्या मजल्यावर राहतात. घटनेच्या वेळी शान उपस्थित होते की नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
हाटे 1.45 च्या सुमारास आगीची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. अग्निशमन विभागाने आग विझवण्यासाठी आणि रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी 10 गाड्या पाठवल्या. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे.