महेश भट्ट आणि आलिया भट्ट विराधात गुन्हा दाखल

शनिवार, 4 जुलै 2020 (22:16 IST)
दिग्दर्शक महेश भट्ट आणि आलिया भट्ट विराधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे भट्ट कुटुंबासमोरील अडचणी वाढताना दिसत  सिनेमा गृह बंद असल्यामुळे 'सडक २' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. १९९१ मध्ये  प्रदर्शित झालेल्या 'सडक' चित्रपटाचा 'सडक २' हा सिक्वल आहे. चित्रपटात हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हणत वडील आणि मुलीवर गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २९५ आणि१२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून येत्या ८ जुलै रोजी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 
 
'सडक २' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये  कैलास मानसरोवर पर्वताचा फोटो वापरण्यात आला आहे. पर्वताच्या टोकावरती चित्रपटाचं नाव लिहिल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं जात आहे. हिंदू धर्मात कैलास पर्वताला धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान आहे. 
 
याप्रकारणी ८ जुलै रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटात पूजा भट्ट देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. याव्यतिरिक्त चित्रपटात अभिनेता संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती