अमेरिकेतील एका बायोटेक्नॉलॉजी कंपनीने ऑस्ट्रेलियात कोरोना व्हायरस संक्रमणावर औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. या औषधांची मनुष्य चाचणी केल्याची घोषणा कंपनीने केली आहे. बायोटेक्नॉलॉजी कंपनी नोवावॅक्सचे प्रमुख संशोधक डॉ. ग्रिगोरी ग्लेनने सांगितलं की, कंपनी पहिल्या चरणात परीक्षण सुरू केलं आहे. ज्यामध्ये मेल्बर्न आणि ब्रिस्बेन शहरात १३१ स्वयंसेविकांवर या औषधाचं परीक्षण केलं आहे.