Look-Back-Entertainment 2024 : 2024 वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहे. अशा परिस्थितीत 2024 मध्ये गुगलवर काय सर्च करण्यात आले हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे. तसेच या वर्षातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री किंवा प्रसिद्ध अभिनेता कोण आहे?गुगलने मनोरंजनाच्या दुनियेची यादी जाहीर केली असून जगभरातील लोकांनी कोणत्या अभिनेत्यांना सर्वाधिक शोधले होते ते सांगितले आहे. तसेच या यादीत तीन भारतीय सेलिब्रिटींचीही नावे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत शाहरुख, सलमान, दीपिका यांसारख्या सुपरस्टार्सना स्थान मिळू शकले नाही.
भारतीय सेलिब्रिटींबद्दल बोलायचे झाले तर या यादीत टीव्ही अभिनेत्री हिना खान, साऊथ स्टार पवन कल्याण आणि अभिनेत्री निर्मत कौर यांच्या नावांचा समावेश आहे. जागतिक शोध यादीत पवन कल्याण दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत हिना खान पाचव्या क्रमांकावर आहे. तर अभिनेत्री निर्मत कौर जागतिक शोध यादीत 8 व्या क्रमांकावर आहे. तसेच ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसौटी जिंदगी की सारख्या शोमधून आपली ओळख निर्माण करणाऱ्या हिना खानने या वर्षाच्या सुरुवातीला खुलासा केला होता की ती स्तनाच्या कर्करोगाशी लढा देत आहे. तेव्हापासून हिना खान चर्चेत आहे.
पण गुगलच्या ग्लोबल सर्च लिस्टमध्ये स्थान मिळवण्यात हिना खान खूश नाही.हिना खानने तिच्या इन्स्टा स्टोरीवर सर्च लिस्टचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आणि लिहिले, मी अनेक लोकांना ही स्टोरी पोस्ट करताना पाहिले आहे आणि या नवीन घडामोडीबद्दल माझे अभिनंदन होत आहे. पण खरंच, ही माझ्यासाठी किंवा मला अभिमान वाटेल अशी काही उपलब्धी नाही. हिनाने लिहिले की, मी प्रार्थना करेन की कोणीही त्याच्या आजारपणासाठी किंवा आरोग्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीसाठी गुगल करू नये. लोकांच्या प्रेमाचा मी नेहमीच आदर करते. माझी इच्छा आहे की लोकांनी मला माझ्या कामाबद्दल आणि माझ्या यशाबद्दल गुगल करावे जसे ते माझ्या आजारापूर्वी करत असत.