मिळालेल्या माहितीनुसार रविवारी ग्वाल्हेरमधील इंदरगंज भागातील 'कैलास टॉकीज' येथे ही घटना घडली असून जेव्हा पीडित चित्रपटाच्या मध्यंतरादरम्यान खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी रेस्टॉरंट मध्ये गेला होता. एका अधिकारींनी सांगितले की, पीडित आणि रेस्टॉरंट मालक यांच्यात वाद झाला आणि रेस्टॉरंट मालकने पिडितवर पैसे न दिल्याचा आरोप केला. एफआयआरनुसार, रेस्टॉरंट मालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी पीडितला मारहाण केली आणि रेस्टॉरंट मालक ने त्याचा कान कापला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की, पीडितने सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली.