अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी महाकुंभात सांसारिक जीवनाचे त्याग करुन आता संन्यासाकडे वळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ममता कुलकर्णी किन्नर आखाड्यात येऊन संन्यासी झाल्या आहेत. ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी स्वत:चे पिंडदान केले आता त्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनतील. त्यांना महाकुंभात दीक्षा देण्यात आली असून आता त्यांना नवीन नाव देण्यात आले असून त्यांचे नाव श्री यामाई ममता नंद गिरी असणार आहे.
किन्नर आखाड्याच्या अध्यक्षा आणि जूना आखाड्याच्या आचार्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी अभिनेत्रीला दीक्षा दिली. अद्याप किन्नर आखाड्याला मान्यता मिळालेली नसल्यामुळे हे जूना आखाड्याशी संलग्न आहे.
किन्नर आखाड्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णी शुक्रवारी किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर होणार आहे. संगम येथील पिंड दानानंतरआखाड्यात त्यांचा पट्टाभिषेक झाला .
शुक्रवारी भगवे कपडे परिधान करून ममता कुलकर्णी महाकुंभाच्या सेक्टर क्रमांक 16 मध्ये असलेल्या किन्नर आखाड्याच्या शिबिरात पोहोचल्या. त्यांचा पट्टाभिषेक येथे झाला आहे. ममता कुलकर्णी यांच्या आगमनाची बातमी कळताच मोठी गर्दी झाली होती.