सीआयडी' हा प्रसिद्ध टीव्ही शोपैकी एक आहे. हा टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सर्वात मोठ्या शोपैकी एक आहे. अलिकडेच 'सीआयडी' परतला आहे. हा शो आता ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राला खूप प्रेम मिळत आहे.
आता 'सीआयडी' बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शोमधील मुख्य पात्र एसीपी प्रद्युम्न आता मरणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाजी साटम हे पात्र गेल्या अनेक वर्षांपासून साकारत आहेत. शिवाजी साटम आता या शोला निरोप देणार आहेत.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शोच्या आगामी भागात दहशतवादी बारबुसा (तिगमांशू धुलिया) सीआयडी टीमला संपवण्यासाठी बॉम्ब ठेवणार असल्याचे दाखवले जाईल. उर्वरित सदस्य वाचतील, तर एसीपी प्रद्युम्नला आपला जीव गमवावा लागेल.
बातमीनुसार, एसीपी प्रद्युम्न यांच्या मृत्यूचे दृश्य चित्रित करण्यात आले आहे आणि ते लवकरच प्रसारित केले जाईल. चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का असावा अशी निर्मात्यांना इच्छा असल्याने अद्याप जास्त माहिती शेअर केलेली नाही.