मुंबई : मनसेचा मेळावा पार

Webdunia
शनिवार, 28 मे 2022 (19:24 IST)
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कामाला लागले आहे. आज त्यांनी मुंबई मनसेच्या पदाधिकार्‍यांच्या मेळावा घेतला. यावेळी सरचिटणीस आणि उपाध्यक्षांना राज्यभरात दौरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसंच, राज ठाकरे एक पत्रक देणार आहे. हे पत्र सर्व कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पदाधिकारी मेळावा पार पडला. मुंबईतील वांद्रे रंगशारदा इथं हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्यभरातून मनसे पदाधिकारी रंगशारदाला पोहचले होते. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना 25 मिनिटं मार्गदर्शन केलं. या मेळाव्यानंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आजचा मेळावा हा संपूर्ण पदाधिकार्‍यांचा होता. फक्त तीन कारणांसाठी आयोजित केला होता. लवकरच सर्व नेते मंडळीच्या राज्यभर दौरा चालू होणार आहे. अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. 

संबंधित माहिती

पुढील लेख