अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, शनिवारी रात्री तापमान शून्यापेक्षा कित्येक अंश खाली नोंदवले गेले. श्रीनगरमध्ये उणे 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे शहरातील आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग रिसॉर्टमध्ये उणे ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वार्षिक अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प असलेल्या पहलगाममधील तापमान उणे ८.७ अंश सेल्सिअस होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रिसॉर्ट हे खोऱ्यातील सर्वात थंड ठिकाण होते. उत्तर काश्मीरच्या कुपवाडामध्ये पारा उणे ६.१ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. खोऱ्याचे प्रवेशद्वार असलेल्या काझीगुंड येथे उणे ६.५ अंश तर कोकरनागचे किमान तापमान उणे सहा अंश नोंदवले गेले. गार वाऱ्यांमुळे खोऱ्यातील अनेक भागातील पाणीपुरवठा लाईन्स बर्फाने गोठल्या होत्या आणि अनेक जलकुंभही बर्फाने झाकले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा घसरल्याने आणखी थंडी पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. २२ ते २५ डिसेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम हिमवृष्टीची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.