Radhika Apte Daughter राधिका आपटेने पहिल्या मुलाचे स्वागत केले: बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे लग्नाच्या 12 वर्षानंतर आई झाली आहे. राधिका नुकतीच लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली होती, त्यानंतर तिची प्रेग्नन्सी उघड झाली होती. आई बनल्यानंतर आठवडाभराने राधिकाने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
राधिका आपटे हिने मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीची मैत्रिण सारा अफजल हिने इन्स्टा पोस्टवर कमेंट करून याचा खुलासा केला आहे. तिने लिहिले, 'माय बेस्ट गर्ल्स.' चित्रात राधिका काम करताना आपल्या मुलाला स्तनपान करताना दिसत आहे.