Actor Allu Arjun news: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याला हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पण सुनावणीनंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनची जामीन मिळाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मीडियाशी बोलताना सुपरस्टारने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले. या कठीण काळात त्यांनी मला खूप साथ दिली, असेही ते म्हणाले. याशिवाय चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याबद्दलही त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की, काळजी करण्यासारखे काही नाही. मी ठीक आहे! मी कायद्याचे पालन करणारा नागरिक असून जनतेला नेहमीच सहकार्य करेन. मी पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करू इच्छितो आणि ही एक अत्यंत दुर्दैवी घटना होती, जे घडले त्याबद्दल मी अत्यंत दु:खी आहे. जिथे एक कुटुंब चित्रपट बघायला जाते आणि कुणाला जीव गमवावा लागतो. हे माझ्या अजिबात नियंत्रणात नव्हते, मी तिथे किमान 30 वेळा गेलो आहे आणि 20 वर्षांपासून मी तिथे चित्रपट पाहण्यासाठी जात आहे. पण असा अपघात कधी झाला नाही. मात्र कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. सुपरस्टार पुढे म्हणाला की, मला माहित आहे की मी कोणत्याही जीवाचे नुकसान कधीच भरून काढू शकत नाही. पण मी त्याच्या कुटुंबाला शक्य तितकी मदत करेन असे देखील अभिनेता म्हणाला.