हैदराबादमध्ये दुर्गा मातेच्या पंडालमध्ये तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञातांनी पुतळ्याची मोडतोड केली आहे. तसेच दुर्गा देवीची साडीही देखील फेकली आहे. तसेच ऑल इंडिया इंडस्ट्रियल एक्झिबिशन सोसायटीच्या आयोजकांनीही या घटनेच्या विरोधात निदर्शने केली आहे याची माहिती समोर आली आहे.
एका पोलीस अधिकारींनी सांगितले की, अज्ञात लोकांनी पहाटे देवीच्या मूर्तीच्या एका हाताचे नुकसान केले आहे. तसेच मुर्तीची जीर्णोद्धार करण्यात आली असून देवीची पूजा सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.