मानसरोवराच्या उत्तरेला शुभ्र संपूर्ण हिमाच्छादित असा कैलास पर्वत आहे. पर्वताच्या बाजूला नदी, पर्वत, समोर शंखसदृश हिमावरण असे दृश्य दिसते.
या पर्वतावर बर्फानेच कोरलेला शिखरांचा देखावा, सरोवरातील निळे पाणी, त्यांच रंगाच्या पाण्याचा लाटा, प्रकाशकिरण लाटावर पडल्यावर चमचमत लाटांच्या वेलांटय़ा, काठावर पोहोचणार्या लाटांचा झुळुक झुळुक आवाज, समोर भव्य कैलास पर्वत, सूर्यास्तामुळे आकाशातली केशराची उधळण आणि त्यानंतर डोंगरामागून उगवलेला केवढा मोठा आणि प्रकाशमान चंद्र! सर्वच अविस्मरणी आहे.
ज्यांना श्वसनाचे विकार, रक्तदाब, मधुमेह वा इतर काही आजार आहेत त्यांनी सर्वप्रथम डॉक्टरांकडून सर्व तपासणी करून डॉक्टरांनी होकार दिल्यास जाण्याचं ठरवावं.