मेष-स्वाभाविक गुणदोष
मेष राशिच्या लोक स्वतला अधिक विद्वान समजतात. पण धर्म व व्यक्तीगत क्षमतांवर ते द्विधा मनस्धितीत असतात. या लोकांना आपला अपमान सहन होत नाही. घरात नेहमी कोणत्यातरी व्यक्तीबरोबर यांचे पटत नाही. वाद विवाद कराताना यांना लवकर जोश येतो. या राशिच्या लोकांचा अनेकवेळा नको त्या व्यक्तींबरोबर संबंध येतो त्यामुळे ते अनेक वेळा अडचणीत सापडतात. आपण बर्याचदा त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करता व यामुळे नंतर आपल्याला पश्चाताप करावा लागतो. कित्येक वेळा आपण वरवरचा व अवास्तविक दृष्टीकोन मांडता. लहान लहान गोष्टींमधून उद्भवणा-या मतभेदांना वाढवू नये. आपल्या आसपासच्या लोकांना आपल्या तर्क-कुतर्कांपासून प्रभावित करू नये. हे लोक आपली चुक झाली तरी कधीच ती मान्य करत नाही. त्यामुळे जोपर्यंत त्यांना मोठे नुकसान होत नाही तोपर्यंत ते आपली चुक मान्य करत नाही. प्रेमाच्या बाबतीत हे लोक दुसर्या लोकांना मूर्ख बनवतात. ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः या मंत्राचे यांनी 10,000 वेळा जाप करावा मनोकामना पूर्ण होइल.