हिवाळ्यात सकाळच्या वेळी कसरत करणे सर्वांनाच कठीण जाते. कडाक्याच्या थंडीत, व्यायामाचा किंवा योगाचा विचार केला तरी ही गोंधळ होतो. अशी काही योगासने आहे ज्यांचा सराव केल्याने हिवाळ्यात ऊर्जावान वाटेल आणि तुम्ही निरोगीही राहाल. हे योगासनं केल्याने तुम्ही ताजेतवाने अनुभवाल.चला तर मग जाणून घेऊ या.
1 प्राणायाम आणि ध्यान -
यासाठी तुम्हाला जास्त शारीरिक हालचाली करण्याची गरज नाही. हिवाळ्यात हृदय आणि फुफ्फुसाच्या संसर्गाची समस्या अधिक वाढू लागते. यासाठी प्राणायाम चा नियमित सराव करा. हे आपल्या दिनक्रमात सामील करा. हे केल्याने दिवसभर ताजे तवाने आणि सक्रिय राहाल. प्राणायाम तुम्हाला उर्जेने भरून टाकेल, ध्यानाने तुमचा अनावश्यक ताण निघून जाईल. तुम्ही श्वसनाच्या समस्यांसाठी उज्जयी प्राणायाम, घशाच्या समस्यांसाठी भ्रामरी प्राणायाम करू शकता.
2 सूर्यनमस्कार-
सूर्यनमस्कार तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवेल. हे केल्याने हिवाळ्यामुळे येणारा आळस दूर होईल. जर तुम्हाला खूप थंडी जाणवत असल्यास सूर्यनमस्काराचा खूप फायदा होणार आहे कारण यामुळे शरीर उबदार राहते. सूर्यनमस्कारामुळे हिवाळ्यात सांधेदुखी किंवा स्नायू दुखणे या समस्यांपासून आराम मिळेल. हे तुम्हाला फिट ठेवेल आणि तुमचे वजन वाढणार नाही.
हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी त्रिकोनासन, शलभासन, बालासन हे काही इतर योगासन आहेत, ते तुम्हाला उत्साही ठेवतील. या योगासनांच्या मदतीने तुम्हाला हिवाळ्यात उत्साही वाटेल. हे तुमचे हृदय आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते. योगामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहण्यास मदत होते आणि सर्व वयोगटातील लोक हे योगासन करून पाहू शकतात