श्वासोच्छवासाच्या आजारासाठी दररोज या आसनचा सराव करा

गुरूवार, 25 मार्च 2021 (17:37 IST)
भुजंगासन याला कोब्रा पोझ देखील म्हणतात, कारण हे करताना शरीराची आकृती फणा काढलेल्या सापाप्रमाणे असते. भुजंगासन हे शरीरासाठी फायदेशीर आहे. हे शरीराला लवचिक बनवतो , तसेच पाठ, मान आणि पाठीचा कणा मजबूत करतो.या आसनाचा सराव करताना हळू‑हळू श्वास घेणे आणि सोडण्याचा सराव करा.
चला तर मग हे आसन कसे करावे आणि याचे फायदे जाणून घ्या.   
 
भुजंगासन कसे करावे - 
सर्वप्रथम जमिनीवर पोटावर झोपा,पाय सरळ ठेवा, पाय आणि टाचा जोडून घ्या. दोन्ही हात, खांद्याच्या समान ठेवा. कोपरे शरीराला लावून ठेवा. दीर्घ श्वास घेत हळुवार डोकं,नंतर छाती, नंतर पोटाला उचला. शरीराला वर उचलत, दोन्ही हाताचा  आधार घेत कंबर मागे ओढा,दोन्ही हातावर भार देत संतुलन बनवा. हळू‑हळू श्वास घेत पाठीचा कणा वाकवत दोन्ही हात सरळ करा. वर बघा. 
 
फायदे- 
* श्वास संबंधित रोगांसाठी हे आसन कारणे फायदेशीर आहे. 
* थकवा आणि तणाव पासून मुक्ती मिळते. 
* पाठ ,मान आणि खांद्याच्या वेदनेपासून मुक्ती मिळते. 
* कंबरेच्या भागाला लवचिक बनवतो. 
* पोटाचा लठ्ठपणा कमी करतो. 
 
* टीप- 
गरोदर स्त्रिया, बरगड्यांमध्ये काही त्रास असेल,किंवा पोटाची शस्त्रक्रिया झालेल्यांनी , या आसनाचा सराव करू नये. दीर्घ काळापासून शरीरात वेदना असल्यास त्यांनी देखील या आसनाचा सराव प्रशिक्षकांच्या मार्गदर्शना शिवाय करू नये.   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती