मेंदी लावल्यावर केस कोरडे होतात या हेयर टिप्स अवलंबवा

गुरूवार, 25 मार्च 2021 (09:50 IST)
उन्हाळ्यात बऱ्याच स्त्रियां केसांना मेंदी लावतात.बऱ्याच स्त्रियांना मेंदी लावल्यामुळे केस रुक्ष आणि कोरडे होण्याची तक्रार असते. या साठी आम्ही काही हेयर टिप्स सांगत आहोत. ज्यांना अवलंबवून आपण केसांचा या समस्येतून सुटका मिळवाल.
 
* केसांना मेंदी लावण्यापूर्वी या मध्ये अंडी,आवळा पावडर,कॉफी सारखे पदार्थ मिसळा. या सर्व वस्त्या नैसर्गिक आहेत. या मुळे आपल्या केसांना काहीच त्रास होणार नाही. आपण अंडीच्या ऐवजी दही मिसळू शकता. 
 
* मेंदी लावण्यापूर्वी केसांना तेल लावा- 
मेंदी लावण्यापूर्वी आपण केसांना तेल देखील लावू शकता आपण मोहरीचे तेल देखील केसांना लावू शकता. 
 
* मेंदी लावल्यावर केसांना धुवावे -
मेंदी लावल्यावर किमान 12 तासानंतर शॅम्पूने केस धुवावे. या पूर्वी केसांना फक्त पाण्याने धुऊन घ्या. स्कॅल्प मध्ये खाज येत असेल तर आपण अँपल साइड व्हिनेगर देखील वापरू शकता.या साठी एक कप पाण्यात अँपल साइड व्हिनेगर मिसळून घ्या आणि या पाण्याने केसांना धुऊन घ्या.
 
* केस कोरडे केल्यावर तेल लावा- 
 
मेंदी लावल्यावर स्कॅल्प ची तेलाने मॉलिश करा. या साठी आपण नारळाचं तेल वापरू शकता. अनेकदा मेंदी स्कॅल्प मध्ये साचते. या मुळे खाज येते. तेलाने किमान 5 मिनिटे तरी मॉलिश करा. नंतर गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो टॉवेल केसांना गुंडाळा. सकाळी केस शॅम्पूने धुऊन घ्या आणि कंडिशनर लावा. 
 
* रात्री झोपताना मेंदीचा रंग आपल्या कपड्यांना किंवा उशीला लागू शकतो . यासाठी केसांना एक सूती कापड गुंडाळून घ्या. जेणे करून मेंदीचा रंग लागणार नाही. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती