5. चेहर्यावर जास्त प्रमाणात रंग लागला असल्यास कच्चं दूध, चंदन पावडर, बेसन आणि दही याचे मिश्रण तयार करुन चेहर्यावर लावावे. वाळल्यावर गार पाण्याने धुऊन घ्यावे.
6. होळी खेळल्यानंतर कॅलामाइन लोशन वापरु शकता. याने रंग सोडवण्यात मदत होते.
7. जर अॅलर्जी जास्त प्रमाणात असेल तर कपडे धुण्याच्या साबण मुळीच वापरु नका. याने त्वचासंबंधी त्रास वाढू शकतात. या ऐवजी कणिक आणि ऑलिव तेल मिसळून वापरु शकता.