यंदाची होळी अशी साजरी करा

रविवार, 28 मार्च 2021 (09:47 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा जगभरात पसरत आहे. मार्च चा महिना सणासुदीचा आहे. या महिन्यात होळीचा आल्हाददायक सण देखील आहे. लोकांना होळी खेळणे आवडते. मुलांचा तर उत्साह या दिवशी दाणगा असतो. सकाळ पासूनच ते रंग आणि पिचकारी घेऊन सज्ज असतात. यंदाची होळी कोरोनाच्या काळात आपण अशी खेळावी या साठी काही पद्धती सांगत आहोत. 
 
1 मास्क आणि हॅन्ड ग्लव्स-यंदाची होळी ग्लव्स आणि मास्क घालून खेळावी. सामाजिक अंतर राखून होळी खेळल्याने कोरोनाच्या नियमाचे पालन देखील होईल आणि आपण देखील सुरक्षित राहाल. यंदा कोरड्या रंगाने होळी खेळा.
 
2 डिजिटल होळी- कोरोनाच्या संसर्गामुळे आपण यंदा डिजिटली होळी खेळू शकता. या साठी कुटुंब आणि मित्रांशी चर्चा करून एकाच वेळी व्हिडीओ कॉलिंग अप्स वरून आपण होळीच्या शुभेच्छा द्यावे. या वेळी आपण एक छोटेसे कार्यक्रम देखील ठेवू शकता. होळीसाठी कलर थीम ठेऊ शकता. जेणे करून सर्वजण रंगबेरंगी दिसतील.
 
3 व्हिडीओ बनवा- आपण या वर्षी होळी खेळू शकतं नाही तरी आपण प्रियजनांना होळीच्या शुभेच्छाचा व्हिडीओ पाठवू शकता. या मध्ये आपण गाणे किंवा जुन्या होळीच्या आठवणी पाठवू शकता. 
 
4 ऑनलाईन स्पर्धा करा - या दिवशी आपण ऑनलाईन आपल्या मित्र कुटुंबियांसह स्पर्धा ठेऊ शकता.या मध्ये अंताक्षरी, कविता, फॅन्सी ड्रेस, काहीही स्पर्धा ठेवू शकता.असं केल्याने आपण सर्व एकत्ररित्या काही वेळ घालवू शकता आणि होळीचा सण साजरा करू शकता.    
 
5 आजी-अजोबांसह होळी खेळा- तरुण मंडळी दर वर्षी आपल्या मित्रांसह होळी खेळतातच परंतु यंदाची होळी आपल्या वडिलधाऱ्यांसह खेळा.आपल्या कुटुंबियांसह खेळलेल्या होळीचे फोटो काढा आणि त्याला अविस्मरणीय क्षण बनवा.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती