आरोग्य आणि शांततेसाठी या 6 योगा टिप्स अवलंबवा

शुक्रवार, 9 जून 2023 (20:21 IST)
अनिरुद्ध जोशी 
 
अनियमित जीवन शैली आणि  दररोजची धावपळ आणि धकाधकीचे जीवन मुळे बरेच रोग,कष्ट आणि मानसिक त्रास उद्भवतात. अशा परिस्थितीत माणूस वयापेक्षा लवकर वृद्धत्वाकडे वळतो आणि आजारी होतो.कारण या परिस्थितीत अन्न देखील पचत नाही आणि मेंदू देखील  शांत राहत नाही. जेणे करून शरीर थकतो. या साठी हे 6 योगा टिप्स अवलंबवा, जेणे करून आपण आयुष्यात सुख,शांती,निरोगी शरीर, मानसिक धैर्य आणि यश प्राप्त करू शकता.
 
1 अंग-संचालन -
आपल्याला कोणत्याही कठीण प्रकारच्या योगासन करण्याची गरज नाही. फक्त अंग-संचालन शिकून घ्या. ह्याला सूक्ष्म व्यायाम देखील म्हणतात. ह्याला आसन सुरू करण्याच्या पूर्वी करतात. यामुळे शरीर आसन करण्यास सज्ज होतो. या सूक्ष्म व्यायामा मध्ये डोळे,मान,खांदा,हात,पाय,टाचा,गुडघे, कुल्हे या सर्वांचा चांगला व्यायाम होतो. 
 
2 प्राणायाम - 
अंग-संचालन करताना जर आपण या मध्ये अनुलोम विलोम प्राणायाम देखील  करता तर  हा  व्यायाम आपल्या अंतर्गत अंगांना आणि सूक्ष्म वाहिनींना शुद्ध करून निरोगी करेल. ह्याचा सराव नसेल तर एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, असं किमान 5 मिनिटे करा. असं केल्यानं शरीरातील साचलेले टॉक्सिन बाहेर निघेल, अन्न पचन होईल आणि शरीरात ऊर्जा आणि उत्साह येईल. 
 
3 मॉलिश- 
महिन्यातून एकदा अंगाची घर्षण,दंडन, थपकी,कंपन आणि संधी प्रसारण पद्धतीने मॉलिश करावी. या मुळे स्नायू बळकट होतात. रक्त परिसंचरण सहजपणे होत. या मुळे तणाव नैराश्यातून मुक्तता होते. शरीर तजेल होत.
 
4 उपवास- 
जीवनात उपवास करणं आवश्यक आहे. उपवास संयम, संकल्प आणि तप आहे. आहार घेणं,झोपणं- जागणं,मौन राहणं आणि गरजेपेक्षा जास्त बोलणं या मध्ये संयम ठेवून आरोग्य आणि मोक्ष घडते.  एकदा तरी आपल्या पोटाला विश्रांती द्या. आठवड्यातून किंवा महिन्यात 2 दिवस उपवास करा काहीच खाऊ नका .कठीण उपवास करा. हे आपल्यासाठी चांगले राहील.
 
5 योग हस्तमुद्रा - 
योगाच्या काही हस्तमुद्रा करून निरोगी  शरीर मिळतो तसेच हे मेंदूला देखील निरोगी ठेवतात. या हस्त मुद्रांचा नियमित सराव चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यावर करावं तर फायदा होईल. घेरंड मध्ये 25 आणि हठ योग प्रदीपिका मध्ये 10 मुद्रांचा उल्लेख आहे, पण हे सर्व योगाच्या ग्रंथांच्या मुद्रांसह एकूण 50 ते 60 मुद्रा आहे. 
 
6 ध्यान -
आजकाल प्रत्येक जण ध्यान बद्दल माहिती मिळवू लागला आहे. ध्यान हे ऊर्जेला पुनर्संचयित करण्याचे काम करतो म्हणून आपण केवळ 5 मिनिटाचे ध्यान कुठेही करू शकता. झोपताना ,उठताना पलंगावर कोणत्याही सुखासनात केले जाऊ शकते. 
 
वरील ह्या 6 उपायांना करून आपण आपले अवघे आयुष्य बदलू शकता, अट अशी आहे की ह्याचे प्रामाणिक पणे अनुसरणं करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती