तुळशीची मंजिरी
तुळशीत श्रीकृष्णतत्त्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणार्या चैतन्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीतील चैतन्य जागृत होते आणि त्याचे रुपांतर विष्णूतत्त्वात होते, त्यातून भक्ताला निर्गुणस्वरुप चैतन्याची अनुभूती येते.
श्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये
तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी राहते.