आज ग्रहण : विठ्ठल- रुक्मिणीच्या नित्योपचारात बदल

रविवार, 21 जून 2020 (11:24 IST)
रविवारी होणार्‍या कंकणाकृती र्सूग्रहणाच्या पार्श्वभूमिवर श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिरात देवाच्या नित्योपचाराच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता ग्रहण काल असला तरी याचे वेध शनिवारी रात्री दहा वाजल्यापासूनच लागत आहेत.  यामुळे  शनिवारी रात्री अकरा वाजता शेजारतीला नैवैद्य सुकामेवा तसेच रविवारी पहाटे साडे चार वाजता काकडाआरतीनंतर नैवैद्याऐवजी सुकामेवा, पेढे, फळ  दाखविले जाणार आहेत. दररोज सकाळी पावणे अकरा वाजता विठ्ठलरुक्मिणीला हानैवेद्य दाखविला जातो. परंतु रविवारी यावेळेत  ग्रहण असल्यामुळे  नैवेद्य दाखविला जाणार नाही.
 
सकाळी दहा वाजता ग्रहण सुरू होताच देवाला स्नान घातले जाणार आहे. तर ग्रहण सुटलनंतर पुन्हा दीड वाजता देवाला स्नान घातले जाणार आहे. स्नानानंतर प्रथम तांदळाची खिचडीचा नैवेद्य तर सायंकाळी पाच वाजता हा नैवेद्य होणार आहे.  यानंतर देवाला पोशाख परिधान केला जाणार आहे. सध्या लॉकडाउनमुळे भाविकांसाठी दर्शन बंदच असले तरी देवाचे सर्व नित्योपपचार परंपरेप्रमाणे पार पाडले जात असल्याचे मंदिर  समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती