✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश Ashadhi Ekadashi Wishes in Marathi
Webdunia
रविवार, 10 जुलै 2022 (10:59 IST)
'संतकृपा झाली इमारत फळा आली ।
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ||
नामा तयाचा हा किंकर तेणे केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।',
चैतन्याचा गाभा… विटेवर उभा
पालख्यांचा सोहळा…
वारकऱ्यांचा मेळा…
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा…
विटेवर उभा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
दिसे रिंगण
टाळ मृदुंगाची धून
रिते तुझे वैकुंठ पांडुरंगा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवो निया
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिंता, व्यथा क्षणाधारत…
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ....
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
जगण्याचं बळ देणारी
विठ्ठला तुझी वारी
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्नी ज्ञानदेव
तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
हरी ओम विठ्ठला…
कोने कोठे दिथेला…
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
हरी ओम विठ्ठला
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
विठु माऊली तू, माऊली जगाची
माऊली मुर्ती विठ्ठलाची
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान
भगवंता, तव तेज ह्या तिमिरात दे आता
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले…
आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले…
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे
पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी
तुझ्या सहवासात राहू दे...
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
पंढरी निवासा सखा पांडुरंगा
सवे रखुमाई, उभा विटेवर
कर कटे वर ठेऊनिया
दाटलासें कंठ
रिते वाळवंट….पाहुनिया
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
सावळी ती मुर्ती हृदयी बिंबली
देहो बुद्धी पालटली माझी साची
धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव
हृदयी पंढरीराव राहतसे
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
ताळ वाजे मृदुंग वाजे
वाजे हरीची वीणा
माऊली निघाले पंढरपुरा
मुखाणे विठ्ठल विठ्ठल बोला
जय जय राम कृष्ण हरी
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
देव दिसे ठाई ठाई, भक्तालीन भक्तापाई
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर
चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
सुखासाठी करिसी तळमळ
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ
मग तू अवघाची सुखरूप होसी
जन्मोजन्मीचे दुःख विसरसी….
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
तुझा रे आधार मला । तूच रे पाठीराखा
तूच रे माझ्या पांडूरंगा ।
चूका माझ्या देवा । घेरे तुझ्या पोटी
तुझे नाम ओठी सदा राहो ।।
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही
चिंता विठ्ठल चरणीं जडोनी ठेली !
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
रूप पाहता लोचनी, सुख जालें ओ साजणी
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा
बहुता सुकृतांची जोडी ,म्हणुनी विठ्ठल आवडी
सर्व सुखाचे आगर, बाप रखुमाई देवीवर
नामयाचे जनी विश्नांती पै झाली
हृदयी राहीली विठ्ठल मुर्ती
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
जातां पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटतांचि
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
मुख दर्शन व्हावे आता…
तु सकळ जनांचा दाता…
घे कुशीत या माऊली…
तुझ्या चरणी ठेवितो माथा…
माऊली माऊली रुप तुझे…
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
पाणी घालतो तुळशीला
वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव सर्वांना
हिच प्रार्थना पांडुरंगाला
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
सावळे सुंदर रुप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझ्या ।
आणिक काही इच्छा आम्हा
नाही चाड।
तुझे नाम गोड पांडुरंगा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली…
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
जो ना भंगे तो अभंग
जो चित्ती राही तोचि रंग
या दोघांसी घेऊनी उभा राही
असा माझा पांडुरंग
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
देव माझा विठू सावळा
आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा
मंदिरी उभा विठू करकटावरी
डोळ्यातून वाहे आता
इंद्रायणी अन् चंद्रभागा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
पुढे परतूनी येऊ
आता निरोप असावा
जनी विठ्ठल दिसावा
मनी विठ्ठल रुजावा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान
भूक हरली रे…
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
आई असते मायेची माई
म्हणुनी धन्य पावतो बघून विठाई
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
अव घा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
मी तुंपन गेले वायां
पाहतां पंढरीच्या राया
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
अठ्ठावीस युगां पश्चात
असा भेटला एकांत
आज देवळात फक्त
रखुमाई पांडुरंग
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
हात कटावरी अन् पाय विटेवरी
मिटलेले डोळे तरी हास्य मुखावरी
असा तो पांडुरंग युगान युगे उभा गाभारी
नीलवर्ण प्रभा दिसे पसरली सभोवरी
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
विठ्ठलाची ओढ किती गोड गोड
जोडुनिया कर फुलेल मन…
तोच भासे दाता तोच मातापिता
विसर जगाचा सर्वकाळ…
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
मी तुझ्यात विरता माझी,
राहिलीच ओळख काय माझी
पंढरीची माय माझी पंढरीची माय
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी
तो पहा विटेवरी, दुमदुमली पंढरी
पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी…
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
डोळे मिठुन करा ध्यान,
दिसेल मंदिराचा कळस
भरून येते मन,
अर्पावी घरीच विठ्ठलाचा तुळस
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
डोळे मिटता सामोरे
पंढरपूर हे साक्षात
मन तृप्तीत भिजून
पाही संतांचे मंदिर
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटतांचि
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
विठ्ठलाचे रुप पहावे मनात…
दुःख सारे दूर होई क्षणात…
तुझे नावच माझे शस्त्र…
आजच्या रणात
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
या जगातले सगळे सुंदर आहेत रंग
पण या नजरेला समाधान देतो पांडुरंग
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
विठू नामाच्या गजरात
अवघा अंतरंग भिजला…
वारकऱ्यांच्या मेळ्यात नाचतांना
मला पांडुरंग दिसला
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
आबादान माती रुजवून भक्ती
नामघोषात मुक्ती विठ्ठल विठ्ठल
तम, मोह सरो, ज्ञान रवी उरो
नाव तुझे राहो, ठायी ठायी
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
तल्लीन झालो तुझ्या भक्तीत
ना सापडे आता मजला दुसरा छंद
सगळीकडे बघावे की वय दिसतो मजला पांडुरंग
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
कोणी म्हणे त्यास विठ्ठला…
कोणी म्हणे त्यास विठुराया…
कोणी म्हणे त्यास पांडुरंग…
कोणी म्हणे विठू सावळा कुंभार…
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
मुखी हरी नाम, चाले वाट पंढरपूर
तल्लीन भक्तीत, माऊलीचा गजर
भक्त जमती सारे नदीच्या तीरावर
कानडा राजा, भेटिस उभा विटेवर
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा पांडुरंग
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
लोचनी तुझ्या दर्शनाची भूक
तृप्त होते पाहुनी तुझे गोड रूप
तुझ समक्ष येतांना विसर पडे जगाचा
हरवून जाते मन शोध लागत नाही स्वतःचा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
तुझे नाव घेता
वाटे मोक्ष आता भेटावा
तुझ्या पंढरीकडे येता
पावलागणिक रस्ता फुलांचा वाटावा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
आषाढ आकाशातून बरसू लागला
तुझ्या चरणी येऊन हा जीव धन्य झाला
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
आराध्य दैवत तू आमुचे
बाप विठू माऊली
मायेचा पदर तू आमच्या
पंढरी राया तू आम्हा सावली
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
हे सुख पुंडलिके
कैसे आणिले बापे ।।
निर्गुण साकारले
आम्हालागी हे सोपे ।।
म्हणुनी चरण धरोनी
तुका राहिला सुखे ।।
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
करुनी विठ्ठल नामाचा घोष
भक्तीभावाने जोडूनी कर
नतमस्तक होऊनी चरणी
करीतो नमन एकादशीच्या दिवशी
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
हरीहर विधाता
आले अलंकापुरी
इंद्रायणी तिरी एक दाटी
योगियांचा सखा कोठें ज्ञानेश्वर
जाती ऋषीश्वर भेटावया
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
पांडुरंगा तुझ्या भक्तीचा झरा
असाच वाहू दे
माझ्या माणसांना नेहमी तुझ्या
सहवासात राहू दे
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
भाळी चंदनाचा टिळा, तुळशी माळ गळा
नित्य आम्हा लागला, पांडुरंगाचाच लळा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
बघून तुझा रंग सावळा
होतो या मी पण बावळा
या जगण्याला मंत्र आता नको वेगळा
अवघा वारीचा सत्संग झाला ज्ञानीयांचा मेळा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली
नाम घेतो तुझे विठू माऊली
वरदहस्त लाभो तुझा सकलांसी
सुखी ठेवा सदैव आम्हा लेकरासी
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
सकाळ हसरी असावी
विठूरायाची मुर्ती नजरेसमोर दिसावी
मुखी असावे विठूरायाचे नाम
सोपे होई सर्व काम
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Ashadhi Ekadashi Wishes In Marathi आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल मंत्र Vitthal Mantra
वारी पंढरीची...
विठ्ठलाच्या परम भक्त सखुबाई
श्रीदेव पंढरीनाथ मंदिर, सागर
सर्व पहा
नवीन
पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या
आरती सोमवारची
सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख
रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती
Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
पुढील लेख
विठ्ठल मंत्र Vitthal Mantra