हैदराबादकडून यावेळी केन विल्यमसन आणि शिखर धवन यांनी 136 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. विल्यमसन, धवनच्या प्रत्येक चौकार आणि षटकारावर स्टेडियमवर चाहत्यांचा जल्लोष सुरू होता. परंतू तेव्हा मैदानात एक खास चाहती उपस्थित होती. भारताला बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकून देणारी पी. व्ही. सिंधू प्रेक्षक म्हणून उपस्थित होती.