नोवाक जोकोविचने अमेरिकेच्या सेबास्टियन कोर्डाचा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. एटीपी मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तो सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला. अशाप्रकारे, 37 वर्षीय जोकोविचने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत सातव्या जेतेपदाच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे.
गुरुवारी झालेल्या त्यांच्या क्वार्टरफायनल सामन्यात जोकोविचने एक तास 24 मिनिटांत कोर्दाचा 6-3, 7-6 (7-4) असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हशी होईल. जोकोविचने 33 वर्षीय दिमित्रोव्हविरुद्ध खेळलेल्या13 पैकी12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
बुधवारी फिल्सने अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला पण19 वर्षीय मेन्सिकविरुद्ध तो हा पराक्रम पुन्हा करू शकला नाही. जगात 54 व्या क्रमांकावर असलेल्या मेन्सिकचा पुढील सामना उपांत्य फेरीत टेलर फ्रिट्झशी होईल, ज्याने इटलीच्या मॅटेओ बेरेटिनीचा7-5, 6-7, 7-5 असा पराभव केला.