ऑस्ट्रेलियन ओपन 2025 च्या उपांत्यपूर्व फेरीत नोव्हाक जोकोविचने कार्लोस अल्काराझचा 4-6,6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. मंगळवारी झालेल्या या सामन्यात जोकोविचला पहिल्या सेटमध्ये 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर 37 वर्षीय स्टार खेळाडूने शानदार पुनरागमन केले आणि सलग तीन सेट जिंकून सामना जिंकला.