भारताच्या 17 वर्षीय प्रतिभावान तिरंदाज अदिती स्वामीने शनिवारी (5 ऑगस्ट) एक मोठी कामगिरी केली. अदितीने वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करत विजेतेपद पटकावले. ज्युनियर जगज्जेतेपद पटकावल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीनंतर, युवा तिरंदाजाने वरिष्ठ जागतिक तिरंदाजी स्पर्धा जिंकली. अदितीने कंपाऊंड महिला एकेरी स्पर्धेत अपवादात्मक प्रतिभा दाखवली आणि अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेराला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले.