16 वर्षीय भारतीय वर्ल्ड नंबर-1 खेळाडूचा पराभव केला, सचिन तेंडुलकरने केले कौतुक

Webdunia
मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (12:17 IST)
16 वर्षीय बुद्धिबळपटू आर प्रागननंदाचे खूप कौतुक होत आहे. आता  त्याचे कौतुक करणाऱ्यांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सामील झाले आहे. बुद्धिबळ जगतातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनला हरवल्याने प्रागननंदाचे कौतुक होत आहे.

ऑनलाइन खेळल्या गेलेल्या 'एरथिंग्स मास्टर्स' या बुद्धिबळ स्पर्धेत प्रागननंदाने कार्लसनचा पराभव केला असून या दिग्गज खेळाडूला पराभूत करण्यासाठी प्रागननंदाला केवळ 39 चाली लागल्या.
 
यावर सचिन तेंडुलकरने म्हटले की काळ्या मोहऱ्यांनी खेळताना असा विजय खरोखरच जादू. सचिन तेंडुलकरने प्रगानंदाचे कौतुक करत लिहिले - प्रागसाठी ही एक अद्भुत अनुभूती असेल. तो आता फक्त 16 वर्षांचा आहे. त्याने  अत्यंत अनुभवी खेळाडू मॅग्नस कार्लसन यांना ते पण काळ्या मोहऱ्यांने खेळून पराभूत केेले आहे. हे खरोखर जादुई होते. भविष्यातील दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा. तुम्ही भारताचा गौरव केला आहे.
 

संबंधित माहिती

पुढील लेख