अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरच्या घरावर ईडीचे छापे

मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (17:46 IST)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरुद्ध नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय (ED) मुंबई आणि आसपासच्या भागात शोध घेत आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्रातील एक राजकारणी देखील ईडीच्या चौकशीत आहे. छापेमारीच्या संदर्भात ईडीचे अधिकारी दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्या घरीही पोहोचले आहेत.डॉन दाऊद इब्राहिमचे लपण्याचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या सर्व ठिकाणी ईडी छापे टाकत आहे.

मुंबईतील हसीना पारकर यांच्या निवासस्थानासह सुमारे 10 ठिकाणी ईडी झडती घेत आहे. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत(पीएमएल ) करण्यात आली आहे. 

ईडीला मिळालेल्या काही गुप्तचर आणि राष्ट्रीय तपास संस्थेने दाखल केलेल्या एफआयआर च्या आधारे ही कारवाई करण्यात येत आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती