शेवग्याच्या पानाची भाजी

शेवग्याचे झाड हे कोकणातल्या अनेक कौलारू घराच्या अंगणात असते. कोकणात याला शेवगा न म्हणता ‘शेगुल’ असे म्हणतात. शेगुलाच्या पाल्याची भाजी रुचकर असली तरी ही भाजी कोवळी असतानाच करतात. गोकुळाष्टमीला कोकणातल्या प्रत्येक घरात ही भाजी कांद्याशिवाय केली जाते.

साहित्य : शेगुलाची कोवळी पाने, कांदा, ओली मिरची, फोडणीसाठी तेल, मीठ, ओले खोबरे, चवीपुरता गूळ, हळद, फणसाच्या आठळ्या.
कृती : शेगुलाची कोवळी पाने धुवून खसखशीत चिरावी. कढईत तेल घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा व फणसाच्या आठळ्याचे बारीक तुकडे घालून परतून घ्यावे. आठळ्याचे तुकडे शिजल्यावर त्यावर ओली मिरची, चिरलेली शेगुलाची पाने व मीठ, गूळ घालून झाकण लावून वाफ काढावी. भाजी शिजते लवकर म्हणून ओले खोबरे घालून भाजी उतरवावी.
या भाजीला आवडत असल्यास वरून लसणीची फोडणी द्यावी. भाजी अधिक रुचकर होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती