मक्याच्या शेवया

साहित्य : शेवया, मक्याच्या कणसाचे कोवळे दाणे, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, तेल, मीठ, मोहरी, हिंग, हळद, कोथिंबीर, खोबरे, साखर. 
 
कृती : सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात मिरच्या बारीक चिरून घालाव्यात. कढीपत्त्याची पाने घालावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा व मक्याचे दाणे घालावेत. थोडे परतून झाकण ठेवून दोन वाफा देऊन शिजवून घ्यावे. नंतर पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ, साखर घालून उकळी आणावी. तेलावर परतलेल्या शेवया या पाण्यात घालाव्यात. नीट हलवून गॅम मंद करून वाफा द्याव्यात व शेवया शिजवून घ्याव्यात. सर्व्ह करताना कोथिंबीर खोबरे घालावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती