श्राद्धात ब्राम्हणांना भोजन देण्यापूर्वी या पाच जणांसाठी भोजन पत्रावळीवर काढा

बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (13:10 IST)
श्राद्ध कर्माच्या दिवशी ब्राम्हणांना भोजन देण्यापूर्वी पंचबली गाय, कुत्रा, कावळा, देवतादि आणि मुंग्यांसाठी भोजन सामुग्री पत्रावळीवर काढावी.
 
गोबली- गायीसाठी पत्रावळीवर 'गोभ्ये नमः' मंत्र म्हणत भोजन सामुग्री काढावी. 
 
श्वानबली- कुत्र्यासाठी 'द्वौ श्वानौ' नमः मंत्र म्हणत भोजन सामुग्री पत्रावळीवर काढावी.
 
काकबली- कावळ्यासाठी 'वायसेभ्यो' नमः' मंत्र म्हणत पत्रावळी वर भोजन सामुग्री काढावी.
 
देवादिबली- देवतांसाठी 'देवादिभ्यो नमः' मंत्र म्हणत खाद्य पदार्थ पत्रावळी वर काढावे.

तसेच मुंग्यांसाठी 'पिपीलिकादिभ्यो नमः' मंत्र म्हणत अन्न पत्रावळी काढावे. 
 
नंतर ब्राम्हणांना ताट किंवा पत्रावळीवर जेवण वाढावे. दक्षिण दिशेकडे मुख करुन कुश, तीळ आणि पाणी हातात घेऊन पितृ तीर्थाने संकल्प करावे आणि एक किंवा तीन ब्राम्हणांना भोजनासाठी बसवावे. 
 
भोजन उपरांत यथा शक्ती दक्षिणा आणि इतर सामुग्री दान करावी आणि ब्राम्हणांना चार वेळा प्रदक्षिणा घालून आशीर्वाद घ्यावा. अशा सोप्या उपायाने पितर तृप्त होतील आणि आपल्याला भरभराटीचा आशीर्वाद देतील ज्याने आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती