पितृ पक्ष विशेष : महाभारतानुसार श्राद्धाची परंपरा अश्या प्रकारे सुरू झाली

शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (20:55 IST)
वेदांच्या पितृयज्ञाला पुराणांमध्ये विस्तार मिळाला आणि त्याला श्राद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. पण जेव्हापासून या पक्षात पितरांच्या श्राद्धाची परंपरा सुरू झाली तेव्हा पासून आजतायगत या परंपरेत फारसे बदल झाले नाही. ही परंपरा देखील प्राचीन काळापासून सुरूच आहे.
 
श्राद्धाची परंपरा अखेर कोणी आणि कधीपासून सुरू केली या विषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत, परंतु महाभारताच्या शिस्त पर्वात एक आख्यायिका आहे ज्यामध्ये श्राद्ध करण्याची परंपरा सांगितली आहे. या पर्वामध्ये भीष्म पितामहाने युधिष्ठिराला श्राध्दपक्षाबद्दल सांगितले आहेत. महाभारतानुसार सर्वप्रथम श्राद्धाचे उपदेश महर्षी नीमीने अत्रीमुनीना दिले होते. महर्षी निमी बहुदा जैन धर्माचे 22 वे तीर्थांकर होते. अशा प्रकारे प्रथम निमीने श्राद्ध सुरू केले, त्यानंतर इतर महर्षी ने देखील श्राद्ध सुरू केले. 

ALSO READ श्राद्ध पक्षात चुकून नका करू हे 10 काम
 
श्राद्धाचे  उपदेश दिल्यानंतरच श्राद्ध कर्माची प्रथा सुरू करण्यात आली आणि हळू हळू करत हे समाजातील प्रत्येक वर्णात प्रचलित झाली. महाभारताच्या युद्धानंतर युधिष्ठिराने कौरव आणि पांडवाच्या पक्षामधील ठार झालेल्या सर्व वीरांचे केवळ अंत्यसंस्काराच केले नाही तर श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून की आपल्याला कर्णाचे देखील श्राद्ध करावयास हवे. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले की कर्ण तर आपल्या कुळाचे नाही तर त्यांचे श्राद्ध मी कसे करू? त्याचे श्राद्ध तर त्यांचा कुळातील लोकांनी केले पाहिजे. या वर प्रथमच भगवान श्रीकृष्ण उलगडला करतात की कर्ण पांडवांचे थोरले बंधू असे. हे ऐकताच सर्व पांडव स्तब्ध झाले.

ALSO READ कोणाला आहे श्राद्ध कर्म करण्याचा अधिकार, जाणून घ्या
 
हे लक्षात घेण्या सारखे आहे की भगवान श्रीरामाने त्यांचा वडिलांचे श्राद्ध केले होते, याचा अर्थ असा की याचा उल्लेख रामायणात देखील आढळतो. म्हणजे की महाभारत काळापूर्वी पासून श्राद्ध करण्याची परंपरा वैदिक काळापासून सुरू आहे. वेदांमध्ये देवांसह पितरांच्या स्तुतीचा उल्लेख करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती