श्रावण विशेष : शिवलिंगाची पूजा कधी पासून सुरू झाली? जाणून घेऊ या ही माहिती...

मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (18:18 IST)
भगवान शिवाचे निराकार रूप म्हणजे शिवलिंग असे. या शिवलिंगाची पूजा करणं कधी पासून सुरू झाले हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सुरुवातीला हिंदू धर्मात मूर्तिपूजा प्रचलित होती किंवा नाही, हे देखील सिद्ध होते की भगवान शिवाच्या या स्वरूपाची उपासना करण्यामागील हे गुपित काय आहे आणि याच रूपात उपासना का सुरू झाली, हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे, चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 पहिले तथ्य : भगवान शिवाने ब्रह्मा आणि विष्णूच्या मधील श्रेष्ठतेबद्दलचा वाद मिटविण्यासाठी एका दिव्यलिंगा(ज्योती)ला प्रगट केले. या ज्योतिर्लिंगाच्या आरंभ आणि शेवट शोधत असताना ब्रह्मा आणि विष्णूंना शिवाच्या या परब्रह्म स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाले. याच काळापासून शिवाला परब्रह्म मानून त्यांचा प्रतिकात्मक ज्योतिर्लिंगाची पूजा करण्यास सुरुवात झाली. हिंदू धर्मात मूर्तिपूजा नसते, पण शिवलिंग आणि शाळिग्रामाला भगवान शंकर आणि विष्णूंचे देवरूप म्हणून याची पूजा केली पाहिजे.
 
2 दुसरे तथ्य : ऐतिहासिक पुराव्यानुसार विक्रम संवताच्या काही सहस्त्रशताब्दीच्या पूर्वी सर्व पृथ्वीवर उल्कांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला. आदिमानवाला यात रुद्राचा (शिवाचा) उदय दिसून आला. ज्या ज्या स्थळी हे उल्का पडले, त्या-त्या स्थळी या पावित्र्य पिंडयांच्या संरक्षणेसाठी देऊळ बांधण्यात आले. अश्या प्रकारे या पृथ्वीवर शिवाची सहस्र देऊळे बांधण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने 108 ज्योतिर्लिंग होते, पण आता फक्त 12चं शिल्लक राहिले आहेत. शिवपुराणानुसार ज्यावेळी आकाशातून ज्योतिपिंड पृथ्वीवर पडले त्यामधून एक दिव्यपुन्ज प्रकाश पसरला. अश्याप्रकाराचे अनेक उल्का पृथ्वीवर पडले होते.
 
3 तिसरे तथ्य: पुरातत्त्वांच्या शोधानुसार प्राचीन मेसोपोटेमिया आणि बॅबिलोन शहरात देखील शिवलिंगाची पूजा केल्याचे पुरावे सापडले आहेत. या व्यतिरिक्त मोहन जोदारो आणि हडप्पा या विकसित संस्कृतीमध्ये देखील शिवलिंगाच्या पूजेचे पुरातात्विक अवशेष सापडले आहेत. सभ्यतेच्या सुरुवातीस लोकांचे जीवन प्राणी आणि निसर्गावर अवलंबून होते, म्हणूनच ते प्राण्याचे संरक्षक म्हणून पशुपतीनाथांची पूजा करीत असत. सैंधव किंवा सिंधू संस्कृती पासून मिळालेल्या एका शिक्क्यावर 3 तोंडाच्या एका पुरुषाला दर्शविले आहे ज्याही अवती भवति अनेक प्राणी दर्शविले आहेत. याला भगवान शिवाचे पशुपती रूप मानले जाते.
 
4. चवथे तथ्य : प्राचीन भारतातच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर मूर्तिपूजा प्रचलित होती, त्याच दरम्यान यामध्ये अश्याही लोकांचा समावेश होता जे मूर्तिपूजेत विश्वास करीत नसे. त्यांनी भगवंताच्या  निराकार स्वरूपाची कल्पना करण्यासाठी शिवलिंगाच्या पूजेची प्रथा सुरू केली असावी कारण शिवलिंग हे भगवंताचे निराकार ज्योतिस्वरूपच मानले आहे. शिवलिंगाच्या पूजे नंतर नाग आणि यक्षांची पूजा करण्याची प्रथा हळू हळू हिंदू-जैन धर्मात वाढू लागली. बौद्धकाळात बुद्ध आणि महावीरांच्या मूर्तींना समर्थन मिळाल्यानंतर राम आणि कृष्णाच्या मूर्ती बनविण्यात येऊ लागल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती