श्राद्धाचे जेवण कावळ्याचे देण्याचे महत्त्व आहे. कावळ्यांना पितरांचे रुप मानले गेले आहे. श्राद्ध ग्रहण करण्यासाठी पितर कावळ्याच्या रुपात नियत तिथीला दुपारी घरी येतात. त्यांना श्राद्ध मिळाले नाही तर रुष्ट होतात. याच कारणामुळे श्राद्धाचा प्रथम अंश कावळ्यांना दिला जातो.