श्राद्ध पक्ष 2020 : श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्याची योग्य वेळ जाणून घ्या

रविवार, 30 ऑगस्ट 2020 (13:57 IST)
अनेक लोकं घरातच श्राद्ध कर्म करतात. म्हणूनच घरातच पिंडदान, तर्पण आणि ब्राह्मण भोज आयोजित करतात. हिंदू कँलेंडरप्रमाणे श्राद्ध पक्ष भाद्रपद कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत म्हणजे एकूण 16 दिवसापर्यंत असतं. या दरम्यान कोणत्या वेळी पितरांसाठी पितृ पूजा आणि ब्राह्मण भोज करावावे हे जाणून घेणे आवश्यक आहे.
 
कुपत, रोहिणी आणि दुपारची वेळ श्राद्धासाठी योग्य : विद्वान ज्योतिष्यांप्रमाणे श्राद्धाच्या 16 दिवसात कुपत, रोहिणी किंवा अपराह्न काळात श्राद्ध कर्म करावे.  
 
कुपत काळ अर्थात दिवसाचा आठवा मुहूर्त काळ असतो. तारखेनुसार हा मुर्हूत प्रत्येक दिवशी वेगळा असतो. कुतप काळात दान केल्याने अक्षय फलाची प्राप्ती होते.
 
श्राद्ध मुहूर्त : यंदा 2 सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या पितृ पक्षात कुतुप मुहूर्त सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:46 पर्यंत आहे. तसेच रोहिण मूहूर्त दुपारी 12:46 ते दुपारी 1:37 मिनिटापर्यंत आहे. दुपारचा मुहूर्त 1:37 मिनिटापासून ते संध्याकाळी 4:09 वाजेपर्यंतचा आहे. दुपार संपण्यापूर्वी श्राद्ध संबंधी सर्व अनुष्ठान 
 
पूर्ण करुन घ्यावे. या व्यतिरिक्त गजच्छाया योगात श्राद्ध कर्म करणे अती उत्तम आणि अनंत पटीने फल प्रदान करणारे मानले गेले आहे. जेव्हा सूर्य हस्त नक्षत्र असल्यास आणि त्रयोदशीला मघा नक्षत्र असल्यास 'गजच्छाया योग' जुळून येतं.

Also Read कोणाला आहे श्राद्ध कर्म करण्याचा अधिकार, जाणून घ्या
 
8 प्रहर : 24 तासात 8 प्रहर असतात. दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4 एकूण 8 प्रहर. साधरणत: एका प्रहर 3 तासाचा असतो ज्यात दोन मुहूर्त असतात. 8 प्रहरांचे नावे:- दिवसाचे 4 प्रहर- पूर्वाह्न, मध्याह्न, अपराह्न आणि सायंकाळ. रात्रीचे 4 प्रहर- प्रदोष, निशिथ, त्रियामा आणि उषा.

Also Read पितृ पक्ष विशेष : महाभारतानुसार श्राद्धाची परंपरा अश्या प्रकारे सुरू झाली
 
24 तासात 1440 मिनिटे असतात:- मुहूर्त सकाळी 6 वाजेपासून सुरु होतो- रुद्र, आहि, मित्र, पितॄ, वसु, वाराह, विश्वेदेवा, विधि, सतमुखी, पुरुहूत, वाहिनी, नक्तनकरा, वरुण, अर्यमा, भग, गिरीश, अजपाद, अहिर, बुध्न्य, पुष्य, अश्विनी, यम, अग्नि, विधातॄ, क्ण्ड, अदिति जीव/अमृत, विष्णु, युमिगद्युति, ब्रह्म आणि समुद्रम.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती