श्राद्ध पक्ष, जाणून घ्या कोणत्या तिथीला काय केल्याने पूर्वज होतील प्रसन्न

भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते अमावस्या पर्यंत श्राद्ध पक्ष असून धर्म शास्त्राप्रमाणे या दरम्यान पितरांना पिंडदान करणारा गृहस्थ दीर्घायू, यश प्राप्त करणारा असतो. पितरांच्या कृपेने सर्व प्रकाराच्या समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते. पितृपक्षात पितरांना संतानद्वारे पिंड दानाची आशा असते. ही आस घेऊन ते पितृलोकातून पृथ्वीवर येतात. मृत्यू तिथीला केलेल्या श्राद्धाला पार्वण श्राद्ध असे म्हटले जातं.
 
प्रतिपदा श्राद्ध
ज्यांची मृत्यू तिथी प्रतिपदेला झाली त्यांचा श्राद्ध अपराह्न व्यापिनी भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदेला केलं जातं. या वर्षी प्रतिपदा 14 सप्टेंबर रोजी आहे.
 
द्वादशी श्राद्ध
भाद्रपद कृष्ण द्वादशी 25 सप्टेंबरला अपराह्न व्यापिनी आहे म्हणून द्वादशी श्राद्ध देखील याच दिवशी होणार.
 
संन्यासी श्राद्ध
संन्यासाचे श्राद्ध पार्वण पद्धतीने द्वादशी करण्यात येतं. मग यांची मृत्यू तिथी कोणतीही असो.
 
अकाल मृत्यू होणार्‍याचे श्राद्ध
वाहन दुर्घटना, सर्प दंश, विषबाधा, किंवा कोणत्याही कारणामुळे अकाल मृत्यू झाली असल्यास श्राद्ध चतुर्दशी तिथीला करावं. चतुर्दशी तिथीला मरण पावणार्‍यांच श्राद्ध चतुर्दशीला करू नये. त्यांचं श्राद्ध त्रयोदशी किंवा अमावास्येला करावे. ज्याला मृत्यू तिथी माहीत नसेल त्यांचं देखील श्राद्ध अमावास्येला करावं.
 
भाद्र शुक्ल पौर्णिमा श्राद्ध
व्यक्तीची मृत्यू पौर्णिमेला झाली असल्यास त्याचं श्राद्ध भाद्र शुक्ल पौर्णिमेला करावं. नवमी तिथीला सवाष्ण स्त्रीचं श्राद्ध करण्याचं विधान आहे.
 
मघा श्राद्ध
26 सप्टेंबर रोजी अपराह्न व्यापिनी असून या दिवशी त्रयोदशी देखील आहे. म्हणूनच मघा नक्षत्र त्रयोदशी तिथीच्या योगात पितरांचं श्राद्ध करण्याचं विशेष महत्त्व आहे.
 
विशेष: एकादशी आणि द्वादशी श्राद्ध 25 सप्टेंबर होणार. एकादशी श्राद्ध अपराह्न काळ दुपारी एक वाजून 30 मिनिटापासून ते दोन वाजेपर्यंत तसेच द्वादशी श्राद्ध (अपराह्न काळ) दुपारी दोन वाजेपासून ते तीन वाजून 53 मिनिटापर्यंत आहे.
 
पंचवली महत्त्व
श्राद्धात पिंड दान आणि तरपण केल्यानंतर पंचवली केल्यावरच ब्राह्मणांना भोजन करवावे. पंचवली विना श्राद्ध पूर्ण मानले जात नाही. गायीला पश्चिम दिशेत मुख करून पानावर, कुत्र्याला जमिनीवर, कावळ्याला पृथ्वीवर, देवता, मनुष्य आणि यक्ष व इतरांना पानांवर तसेच मुंग्यांना पानावर भोजन दिले पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती