शरद पौर्णिमेच्या दिवशी आटीव दूध, मसाला दूध, बासुंदी किंवा खीरीचं नैवेद्य दाखवलं जातं. या दिवशी या पदार्थाचे सेवन करण्यामागील कारणे कोणती आहे तसेच त्याचे वैज्ञानिक महत्त्व काय जाणून घ्या-
1 अमृत किरण - असे म्हणतात की या दिवशी आकाशातून अमृत किरणांचा वर्षाव होतो. या किरणांमध्ये अनेक रोगांचा नायनाट करण्याची क्षमता असते. अशामध्ये या किरणांमुळे बाह्य शरीरासह आंतरीक आरोग्यास देखील फायदा मिळतो. म्हणून खीर किंवा दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून मगच सेवन केले जाते. हेच कारण आहे की शरद पौर्णिमेच्या रात्री लोकं आपल्या घराच्या गच्चीवर खीर किंवा दूध ठेवतात.
3 हिवाळ्याचा स्वागत - शरद पौर्णिमेपासून हंगामात बदल होण्याची सुरुवात होते. या तिथी नंतर वातावरणात थंडावा होऊ लागतो. हिवाळ्याची सुरुवात होते. शरद पौर्णिमेच्या रात्री खीर खाणं हे या गोष्टीचे प्रतीक आहे की हिवाळ्यात आपल्याला गरम पदार्थांचे सेवन केले पाहिजे, कारण या गोष्टींमुळे हिवाळ्यात सामर्थ्य मिळतं.
4 पौष्टिक पदार्थांचे सेवन - खीर मध्ये दूध, तांदूळ, सुके मेवे हे सर्व पौष्टिक साहित्य टाकले जातात, जे शरीरास फायदेशीर असतात. या गोष्टींमुळे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते. आरोग्य चांगलं राहतं. तसेच खीर जर पौर्णिमेला बनवून खाल्ल्यास याची गुणवत्ता दुप्पट होते.