धनत्रयोदशीला अख्खे धणे आणि मीठ का विकत घेतले जाते?
शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025 (11:23 IST)
दिवाळीतील मुख्य सणांपैकी एक सण धनत्रयोदशी या वर्षी १८ ऑकटोबरला साजरी केली जाणार आहे. तसेच धनत्रयोदशीचे विशेष महत्व असून धनत्रयोदशीला अख्खे धणे आणि मीठ विकत घेण्याची प्रथा हिंदू संस्कृतीत पाळली जाते. यामागे काही धार्मिक आणि प्रतीकात्मक कारणे देखील आहे.
समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक-
धनत्रयोदशी हा धन, संपत्ती आणि समृद्धीचा सण आहे. अख्खे धणे हे धानाचे प्रतीक मानले जाते, कारण 'धन' शब्दाशी त्याचे नाव साम्य आहे. त्याचप्रमाणे मीठ हे जीवनातील मूलभूत आणि आवश्यक घटक मानले जाते, जे स्वाद आणि समृद्धी दर्शवते. या दोन्ही गोष्टी विकत घेणे म्हणजे घरात सौभाग्य आणि संपत्ती आणण्याचे प्रतीक आहे. तसेच, धनत्रयोदशीला अख्खे धणे आणि मीठ विकत घेण्याची प्रथा विशेषतः गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील काही भागांत पाळली जाते.
धनत्रयोदशीला लक्ष्मी पूजनाचे महत्त्व-
धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजन केले जाते. अख्खे धणे आणि मीठ हे लक्ष्मी मातेला अर्पण करण्यासाठी वापरले जातात. असे मानले जाते की या वस्तू खरेदी करून आणि पूजेत वापरून घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थिरता येते.
आयुर्वेदिक आणि प्राकृतिक महत्त्व-
धणे आणि मीठ या दोन्ही गोष्टी आयुर्वेदात विशेष स्थान राखतात. धणे हे पाचक आणि औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते, तर मीठ जीवनासाठी आवश्यक आहे. या वस्तू खरेदी करणे हे घरात आरोग्य आणि कल्याण आणण्याचेही प्रतीक आहे.
परंपरेचा भाग-
ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. धनत्रयोदशीला नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे, आणि धणे व मीठ या स्वस्त पण महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करणे सर्वांना शक्य असते. यामुळे ही प्रथा सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे.
तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारातून अख्खे धणे आणि मीठ विकत घेतले जाते. हे घरात आणून लक्ष्मीपूजनात ठेवले जाते किंवा पूजेच्या ठिकाणी अर्पण केले जाते. ही प्रथा स्थानिक रीतिरिवाजांनुसार बदलू शकते, पण यामागचा मुख्य उद्देश घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता आणणे हा आहे. अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.