पुढाकार न घेणे/लाज वाटणे
आपण लाजाळू किंवा संकोची असाल आणि इच्छा असली तरी पुढाकार घेत नाही अशात योग्य वेळ टळते. इच्छा असल्यावर पुढाकार घेऊन पार्टनरला त्यासाठी तयार केल्याने त्यानंतर मिळणार मजा औरच असेल. संबंध सुरू करताना किंवा त्या दरम्यान आपल्याला काय हवं, आपली आवड काय हे सांगण्यात लाज वाटत असल्यास आपल्या मर्जी कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आपली आवड आणि कल्पना पार्टनरसोबत शेअर केल्याशिवाय मजा येणार तरी कसा.
रिलॅक्स नसणे
उत्तम सेक्स लाइफसाठी रिलॅक्सेशन आवश्यक आहे. कोणतेही काम घाई घाईत किंवा करायचे म्हणून केल्याने मजा येत नसतो. बेडवर गेल्यावर लगेच झोपण्यापेक्षा एकमेकांसाठी क्वालिटी टाइम काढणे अधिक योग्य ठरेल. स्पॉन्टेनियस राहावे. दररोज सेक्स एक काम म्हणून खानापुरती करण्यापेक्षा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा काही नवीन पद्धती केल्याने त्याचा भरपूर मजा घेता येऊ शकतो.
अव्यवस्था असणे
बेडवर घाण चादर, बेडरूममध्ये पसारा, शुद्ध वार्याची कमी, विचित्र रंगाचा नाइट लँप, अशा वातावरणात मूड बनण्याऐवजी बिघडू शकतो. आपलं बेडरूम या प्रकारे ठेवावं की ताण दूर करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज भासायला नको.