युक्रेनच्या सुमी शहरात रशियन क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात 20 हुन अधिक लोकांचा मृत्य

सोमवार, 14 एप्रिल 2025 (18:53 IST)
युक्रेनच्या सुमी शहरात रशियाने मोठा प्राणघातक हल्ला केला आहे. रशियाच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तथापि, जखमींची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. हल्ल्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
ALSO READ: Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनचा एकमेकांवर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप
युक्रेनियन शहराच्या कार्यवाहक महापौरांनी रविवारी रशियाने केलेल्या या प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली. रविवारी स्थानिक रहिवासी 'पाम संडे' साजरा करण्यासाठी जमले होते, तेव्हा रशियाने घातक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तिथे उपस्थित असलेले लोक त्यात अडकले आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडले. 
ALSO READ: म्यानमार पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्याने हादरला
जवळजवळ 3 वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात युक्रेन एका भयानक संकटाचा सामना करत आहे. त्याची सर्व प्रमुख शहरे उध्वस्त झाली आहेत. या युद्धात हजारो सैनिक आणि लोक मारले गेले आहेत. तर हजारो लोक अपंगही झाले आहेत. पण हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. "पाम रविवारी आपल्या लोकांना एक भयानक दुर्घटना सहन करावी लागली. दुर्दैवाने २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे," असे महापौर आर्टेम कोबझार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
Edited By - Priya Dixit 
 
ALSO READ: हवेतच हेलिकॉप्टर बिघडले आणि नदीत पडले,6 जणांचा मृत्यू
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती