युक्रेनच्या हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, रशियाने 39 ड्रोन आणि चार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यामुळे राजधानी कीव हादरले. सर्व झोपलेले लोक पुन्हा कधीच उठू शकले नाहीत. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. मात्र, सुरुवातीला जखमींचा आकडा समोर आलेला नाही. युक्रेनच्या हवाई संरक्षण दलाने दोन क्षेपणास्त्रे आणि 24 ड्रोन पाडले.
रशियन हल्ल्यात युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या हल्ल्यांची माहिती गोळा केली जात आहे. पण कीव सिटी मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख तैमूर ताकाचेन्को यांनी सांगितले की, शेवचेन्किव्स्की जिल्ह्यात क्षेपणास्त्र आदळल्याने चारही जण ठार झाले.