जिल्ह्यात हवामान खात्याचा अंदाज अंशतः का होईना, खरा ठरत असल्याचे दिसून येत आहे. विभागाने विदर्भातील जिल्ह्यांसाठी एक अंदाज वर्तवला आहे,
गेल्या 3-4 दिवसांपासून हवामान निरभ्र होईल असे वाटत होते. पण आता परिस्थिती पुन्हा बदलली आहे. दररोज सकाळी आकाश निरभ्र दिसते आणि सूर्यही चमकतो. पण दररोज दुपारनंतर आकाश ढगाळ होते आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत असला तरी, हे हवामान शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा वाजवत आहे.