तसेच जोरदार वाऱ्यांसह गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत पडले आहे. विदर्भात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, तर मराठवाडा आणि मुंबईलाही पावसाचा तडाखा बसला आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी लोकांना छत्र्यांचा वापर करावा लागत आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टनुसार, पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस पडू शकतो. विशेषतः, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, ८ जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील ५ दिवस विदर्भातील गडचिरोली, गोडिया, अकोला, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, वाशीम आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर, पुढील ३ दिवस मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथे मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
तसेच हवामान खात्याने मराठवाड्यासाठीही गंभीर इशारा दिला आहे. पुढील ५ दिवस लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे कारण या हवामानामुळे त्यांच्यासाठी अधिक अडचणी येऊ शकतात. मार्च महिन्यापासून, अवकाळी पावसाने राज्यभर कहर केला आहे आणि आतापर्यंत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.