राज्यात या जिल्ह्यात जोरदार पावसामुळे यलो अलर्ट

शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (09:48 IST)
हवामान खात्यानं उद्या म्हणजे 4 सप्टेंबर पासून राज्यात सलग तीन दिवस पावसाचा जोर असण्याची शक्यता वर्तवली आहे.राज्याच्या बुलढाणा, अमरावती,अकोला,यवतमाळ,वाशिम,या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.तर 5 सप्टेंबर रोजी बीड,लातूर,परभणी,सोलापूर,नांदेड,सिंधुदुर्ग आणि सांगली मध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
 
हवामान खात्यानं पुणे,सातारा,रत्नागिरी,अहमदनगर,मराठवाड्यात 5 सप्टेंबरसाठी   यलो अलर्ट जारी केला आहे.6 सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.या साठी यलो अलर्ट जारी केले आहे.
 
महाराष्ट्रात यंदा सप्टेंबर महिन्यात पुढील चार दिवस बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाब पट्टा निर्माण होण्यामुळे मान्सुन  सक्रिय होऊन सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याच्या अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस असल्याने शेतकरी बांधवाना दिलासा मिळणार आहे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती