Yavatmal : कंटेनरच्या धडकेत दोन विद्यार्थी गंभीर जखमी

Webdunia
रविवार, 29 ऑक्टोबर 2023 (13:05 IST)
बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेशनल हायवे बोथली शिवारातील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक शनिवारी दुपारी विरुद्ध दिशेने नागपूर मार्गे जात असलेल्या भरधाव कंटेनर ने दुचाकीवरून समोरून येत असलेल्या दोन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना धडक दिली. या धडकेत ते दोघे गंभीर जखमी झाले आहे. साहिल गुंडजवार आणि सुहास बांगडे असे या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. हे दोघे मोहगावातील अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.टेक चे विद्यार्थी आहे. 

कॉलेज मध्ये जात असताना त्यांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. सुहासचा बाईकवरून नियंत्रण सुटल्यामुळे त्याची दुचाकी कंटेनरच्या खाली आली. . 

या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहे. या अपघातानंतर कंटेनरचालक कंटेनर सोडून पसार झाला.  
घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती अंत्यंत नाजूक असल्याची माहिती आहे. पोलीस कंटेनरचालकाचा शोध घेत आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

पुढील लेख