साईदर्शनाला येतांना ऑनलाइन पास काढूनच दर्शनाला यावे

बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (22:24 IST)
साईदर्शनाला येतांना ऑनलाइन पास काढूनच दर्शनाला यावे असे आवाहन शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले आहे. तसेच सर्व साईभक्तांना साईसंस्थांनच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
 
सर्व साईभक्तांना साईसंस्थांनच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावर्षीही सालाबादप्रमाणे साईसंस्थानमध्ये दिवाळी साजरी होणार असून दिवाळीनिमित्त साईमंदिर परिसरात विद्युत रोषणाई बरोबरच सुरेख रांगोळ्या काढून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीये.साईदर्शनाला येतांना ऑनलाइन पास काढूनच दर्शनाला यावे असे आवाहन साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले आहे.
 
असे आहेत नवे नियम
 
-15 हजार भक्तांना केवळ ऑनलाइन दर्शन पास
-शिर्डीत ऑफलाईन पास मिळणार नाही
-शिर्डीत येताना ऑनलाइन दर्शन आणि आरती बुकिंग करूनच यावे लागणार
-sai.org.in या संस्थानच्या वेबसाईटवर मिळणार ऑनलाईन पास
- 10 हजार भाविकांना मोफत तर 5 हजार भाविकांना सशुल्क ऑनलाईन पास मिळणार
- साई प्रसादालय राहणार बंद
- शिर्डीतील रेस्टॉरंट आणि  अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय रात्री 8.30 नंतर राहणार बंद

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती